मुंबई | प्रसिद्ध फॅशन डीझायनर प्रत्युषा गरिमेलाचं शनिवारी ११ जून रोजी निधन झालं आहे. ती ३५ वर्षांची होती. हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील तिच्या राहत्या घरी प्रत्युषाचा मृतदेह आढळला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. तसंच प्रत्युषा गरिमेलाच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
प्रत्युषा ही बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगर या भागामध्ये राहत होती. एएनआयच्या रिपोर्टनुसार, प्रत्युषाच्या बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइड मिळालं आहे. तपास सुरु असताना हा संशयास्पद मृत्य असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्युषाच्या निधनाची बातमी सुरक्षारक्षकानं पोलिसांनी दिली आहे. सुरक्षा रक्षकाला काहीतरी विचित्र घडत आहे याची जाणीव झाली आहे. त्यावेळी त्याने प्रत्युषाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना बाथरुममध्ये प्रत्युषा मृतावस्थेत आढळली.
दरम्यान, प्रत्युषाचा देशातील सगळ्यात सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या यादीमध्ये समावेश आहे. तसंच तिचा स्वतःचा देखील एक फॅशन ब्रँड होता. प्रत्युषा गरिमेला असं तिच्या या फॅशन ब्रँडचं नाव होतं. हैद्राबादसह मुंबईमध्ये तिच्या फॅशन ब्रँडच्या शाखा होत्या.