#FIFA World Cup 2026 | फिफाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतेय अशी गोष्ट!

नवी दिल्ली – FIFA World Cup 2026 | फिफाची 2026 मधील स्पर्धेचं यजमानपद हे अमेरिका (america), मेक्सिको (mexico) आणि कॅनडा (canada) या देशांना मिळालं आहे. (FIFA Latest Marathi News) फिफाच्या इतिसाहासमध्ये पहिल्यांदाच तीन देशांकडे विश्वकरंडकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (FIFA) या फुटबॉलच्या प्रशासकीय संस्थेने गुरुवारी रात्री विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या 16 यजमान शहरांची घोषणा केली. 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून यंदा 32 ऐवजी 48 संघाचा यामध्ये समावेश असणार आहे.

दरम्यान, स्पर्धेतील 80 पैकी 60 सामने हे अमेरिकेमध्ये खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित 10, 10 सामने हे अनुक्रमे कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकेतील फुटबॉल जगतासाठी हा एक अनोखा आणि मोठा क्षण असल्याचं अमेरिकन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कार्लोस कॉर्डेरियो यांनी सांगितलं.

RashtraSanchar: