‘हे’ आहे महागाईचे मुख्य कारण- राजनाथ सिंग

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे पुणे दौर्यावर असून त्यांनी महागाईवर भाष्य केलं आहे. तसंच त्यांनी टिंगरेनगर येथे भाजप पदाधिकार्यांशी संवाद साधला. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, गणेश बीडकर, बापू पठारे आदी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतासह जगातील सर्व देशावर झाला असल्याचंही राजनाथ सिंग म्हणाले.

तसंच अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश असूनही येथे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग त्याचे चटके भारतालाही आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी हिंमतीने पुढे जावं असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. याचबरोबर भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याने समाजासाठी जबाबदारी आपली मोठी आहे. याची जाणीव ठेवा. प्रारंभापासून आपली विचारसरणी वेगळी सत्ता मिळविण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी राजकारण करत आहोत हे विसरू नका. असंही सिंग म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदीजीनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामुळे भारताची जगात सर्वात ताकदवान देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे.तसंच लवकरचनागरिकांसाठी घर आणि ग्रामीण भागात शौचालय बांधले जाणारा आहेत. जनधन योजनेतून ४५ कोटी बँक खाते उघडण्यात आल्याने शासकीय योजनेतील भ्रष्टाचार बंद झाला असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं.

Nilam: