“नळावर होते तसे भांडण विधानभवनात होतंय, या आमदारांना लाज वाटली पाहिजे”

मुंबई – Monsoon Session : विधानसभेचे अधिवेशन सुरु झाल्यापासून दररोजच विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेते आणि भाजपच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मात्र, आज त्याच्याउलट घडले. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर थांबून विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, या घोषणाबाजीने वादविवादाला तोंड फोडले. तो वाद सत्ताधारी आणि विरोधकांत धक्काबुक्की करण्यापर्यंत पोहोचला.

विधानभवनाच्या बाहेर झालेल्या नेत्यांच्या या भांडणावरून राज्यातील नागरिक आणि इतर पक्षांतील नेते संतप्त झाले आहेत. लोकांनी निवडून दिलेले नेतेच जर अशा प्रकारे भांडण करत असतील तर जनतेचे प्रश्न कोण सोडवानार? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, स्वभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘नळावर जसे भांडण होतात, तसेच भांडण विधानभवनामध्ये होत आहेत, या आमदारांना थोडी लाज वाटली पाहिजे’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“सामान्य जनतेने आपल्याला कशासाठी निवडून दिले आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अतिवृष्टीने त्रस्त असलेली जनता करत आहे. शेतकरी हवालदिल आहेत. मंत्रालयासमोर शेतकरी पेटून घेत आहे, एवढी वाईट स्थिती आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. अशा अवस्थेत ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने पाहायचं ते आमदार आज नळावर भांडण होतात तसे भांडण करत आहेत.” अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Dnyaneshwar: