अमिताभ बच्चनचा ही पिक्चरही फ्लॉप होतो मात्र बच्चन बच्चन आहे, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुणे – Supriya Sule on Amitabh bachhan | आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षं ते विरोधात होते तर अर्धी वर्ष सत्तेत होते. कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

ज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, भाजपने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार यावर सगळं बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाही, आम्ही खूप सिरियस काम करत असल्याचंही सुळे म्हणाल्या.

RashtraSanchar: