Seema Haider – सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Seema Haider) ही चांगलीच चर्चेत आहे. भारतातील सचिन मीना (Sachin Meena) या तरूणाच्या प्रेमासाठी सीमा हैदर भारतात आली असल्याचं तिनं सांगितलं आहे. पण ती भारतात आल्यापासून तिच्याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून दहशतवाद विरोधी पथक (Anti Terrorist Squad) एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. सीमाचा दहशतवादाशी संबंध असल्याचा आणि ती गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश एटीएसकडून तिची चौकशी सुरू आहे.
सीमा हैदरची एटीएसकडून चौकशी सुरू आहे. पण अजूनही या चौकशीत कोणतीही महत्त्वाची माहिती समोर आलेली नाहीये. तसंच एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरला कोणताही प्रश्न विचारला तरी ती त्याचं एकच उत्तर देत आहे. मी फक्त सचिनच्या प्रेमापोटी भारतात आली आहे, असं उत्तर सीमा देत आहे. तिनं नोएडा पोलिसांना देखील हेच उत्तर दिलं होतं.
दरम्यान, ATS च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमानं अत्यंत कडक असं प्रशिक्षण घेतलं असावं. त्यामुळे ती कोणताही खुलास करत नसून एकच उत्तर देत असावी. तर आता पोलीस मानसशास्त्राला घेऊन तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. जेणेकरून ती खरं बोलतेय की खोटं हे समजण्यास मदत होईल.