मुंबई | Gajanan Kale On Shivsena | काही वेळा पूर्वी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असलेयाचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. यामध्ये मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. “छत्रपतींच्या वंशजाला दु:खी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं. उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ (Shivsena) वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत,” असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. Gajanan Kale On Shivsena
संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानं अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. तसंच संभाजी राजेंच्या या निर्णयावर गजानन काळे यांनी ट्विट (Tweet) करत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. “उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”असं गजानन काळे म्हणाले.
दरम्यान, गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. शिवसेनाचा ‘खोटीसेना’ असा त्यांनी उल्लेख केला आहे. “चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात. भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये. हिम्मत असेल तर शिवाजी (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळ येऊन सांगा की आम्ही राजेंना शब्द दिला नव्हता.” असंही गजानन काळे म्हणालेत.