इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन; गृहखातं लक्ष देत नसल्याचं आरोप

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे बंदी अकबरूद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद मधील औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हेदेखील उपस्थित होते.

मात्र आता इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील गृहखातं देखील या घटनेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केलं आहे.

आज त्यांनी औरंगाबाद शहराततील पाणीप्रश्न, नामांतर यावरुन फडणवीस व ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. निवडणुकाजवळ आल्या की पाण्यावरुन राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

Dnyaneshwar: