“शिंदे सरकारची सत्ता स्थापन होताच जनतेला तीन मोठे गिफ्ट”: सुप्रिया सुळेंचा निशाणा

SUPRIYA SULE EKNATH SHINDESUPRIYA SULE EKNATH SHINDE

मुंबई : दहा दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड केलेल्या पन्नास आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर अनेक मोठमोठे चांगले निर्णय घेतले असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने राज्यातील जनतेला तीन मोठमोठे गिफ्ट दिले आहेत असं म्हणून त्यांनी नवीन सरकारवर टीका केली आहे. नव्या सरकारने स्थानापन्न होताच वीजदरवाढीचं तिसरं गिफ्ट जनतेला दिलं आहे. त्याआधी सरकारने गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होतो. त्याचबरोबर अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी वाढवून ही दोन गिफ्ट देण्यात आली आहेत.” असं ट्विटरद्वारे म्हटल्या आहेत.

त्याचबरोबर वीजदरवाढ आणि महागाईत जनतेला एकनाथ शिंदे सरकारने दिलासा द्यावा अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Dnyaneshwar:
whatsapp
line