पुण्यात दहा लाख घरांत पोहोचविणार तिरंगा ध्वज; भाजप प्रवक्ते धनंजय जाधव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यातील दहा लाख घरांपर्यंत तिरंगा ध्वज पोहोचविण्याचा संकल्प आहे, असे भाजपचे शहर प्रवक्ते, तिरंगा अभियानाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी शुक्रवारी सांगितले.

राष्ट्रसंचार कार्यालयाला धनंजय जाधव यांनी भेट दिली आणि संपादक वर्गाशी चर्चा केली. राष्ट्रसंचारच्या उपक्रमशीलतेचे स्वागत करून त्यात सहभागी होण्याची तयारी जाधव यांनी दर्शविली. राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे यांनी पुष्पगुच्छ देऊन जाधव यांचे स्वागत केले.

सर्व सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्र प्रेमाची ज्योत जागविण्यासाठी घरोघर तिरंगा पोहोचविणार आणि १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरी तिरंगा फडकवला जावा,असा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी भाजपने तिरंगा अभियान राबविण्याचे ठरविले आहे.मोठ्या प्रमाणात ध्वज उपलब्ध केले जातील,महापालिकेच्या कार्यालयात माफक दरात नागरिकांना मिळतील,अशी व्यवस्था केली का आहे. या संपूर्ण आखणीसाठी समित्या नेमल्या आहेत,असे जाधव यांनी सांगितले.या अभियानाला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे त्यातून १५ ऑगस्टला शहरात चांगले वातावरण निर्माण होईल,असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

Dnyaneshwar: