मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. तसंच राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राज यांच्यावर निशाणा साधला आहे.
भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.