सिंहगड महाविद्यालयाचा ‘ट्रेडिशनल डे’ उत्साहात

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयात तीन दिवसांच्या सांस्कृतिक दिनाची सांगता झाली. सांस्कृतिक दिन म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे पेहराव करून महाविद्यालयांमध्ये येण्याची संधी असते. अशीच संधी सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थ्यांना लाभली.

दि.२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजित ‘ट्रेडिशनल डे’ (सांस्कृतिक दिन) अंतर्गत अनुक्रमे ट्वीन डे/ग्रुप डे, बॉलीवूड डे/रेट्रो डे आणि ट्रेडीशनल डे असे साजरे केले गेले. संकुलामधील ७ महाविद्यालयाचे जवळपास ५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज नटून-थटून येऊन मित्र-मैत्रिणींसोबत फोटोग्राफ, व्हिडिओ करण्यात रंगून गेले होते.

‘ट्रेडिशनल डे’च्या दिवशी रंगीबेरंगी पेहेरावामुळे सिंहगड इन्स्टिट्यूटचे वातावरण आनंदमय झाले होते. विद्यार्थ्यांनी तिन्ही दिवशी या सांस्कृतिक दिनाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व महाविद्यालयामधील सांस्कृतिक विभागाने, सुरक्षा विभाग या सर्वांनी आपले विशेष योगदान दिले. वर्षभर अभ्यासाच्या तणावातून ‘ट्रेडिशनल डे’सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना उत्साह मिळाला.

Prakash Harale: