Sex केल्यानंतर स्मृतिभ्रंश म्हणजेच मेमरी लॉस (memory lost) होऊ शकते यावर कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र, असा प्रकार आयर्लंड (Ireland) मध्ये समोर आला आहे. पत्नीसोबत सेक्स केल्यानंतर अवघ्या 10 च मिनिटांत पतीला स्मृतिभ्रंश झाला आणि तो अक्षरशः सगळं काही विसरून गेला.
Sex केल्यानंतर काही वेळासाठी स्मृतिभ्रंश होण्याच्या शक्यता असतात. मात्र असा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. या आजाराला ट्रान्झिस्ट ग्लोबल एम्नेसिया (transient global amnesia) म्हणजे अलीकडील घटनांची तुमची आठवण नाहीशी होते, त्यामुळे तुम्ही कुठे आहात किंवा तुम्ही तिथे कसे पोहोचले हे तुम्हाला आठवत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीला Sex केल्यानंतर 10 मिनिटांतच स्मृतिभ्रंशाचा सामना करावा लागला. संबंधित व्यक्ती ही 66 वर्षाची आहे. यापूर्वीही त्या व्यक्तीला स्मृतिभ्रंशाचा सामना करावा लागला होता. मात्र काही दिवसांनी तो ठीक झाला.