अरुणा टोपरे |
काल दिवसभर मनात अनेक गोष्टी येत होत्या, अनेक प्रश्न रिंगण घालत होते. ते मांडायचा हा एक प्रयत्न. समाजाचा आवाका व वेग प्रगतीची व्याख्या, सगळेच खूप बदललं आहे सुखाची, समाधानाची व्याख्याही! पण असं असतानाही काही जण आपल्या आदर्शांवर कायम असतात. मदत, दान-धर्म हे त्यांच्या चांगुलपणात गृहीत धरलेले असते. आज कोणाहीकडे, माझ्याकडे वेळच नाहीये हे वाक्य तयार असतं आणि दुस करत असतील, तर त्यावर टीका-टिप्पणी करण्यासाठी भरपूर फुरसत असते. स्वतः काही करणार नाहीत, पण कुणी काम करीत असतील तर अडथळा आणायचं काम मात्र वेळात वेळ काढून करतात हे विशेष!
मी जे माझ्या मुलांना सांगते तेच सगळ्याच मुलांना सांगणार आहे, तुमचा तुमच्या कामावर, त्याच्या खपणावर जर विश्वास आहे, तर लोक काहीही म्हणू देत, दुर्लक्ष करा व आपलं काम लक्षपूर्वक करीत राहा.
लहानपणी ऐकलेल्या नीतीकथा, ईसापच्या बोधकथा, त्यांचा हेतू लक्षात घ्या. कुछ तो लोग कहेंगे! … हे गाणं हेचं तर सांगतं, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा! श्रद्धेने व निष्ठापूर्वक काम करीत राहा. आज टीका करणा लोकच उद्या तुमची तारीफ करायला पुढे असतील हे लक्षात घ्या.
आज अनेक प्रसिद्ध व्यक्ती अशाच टीकांना तोंड देत इतक्या प्रसिद्ध झाल्या आहेत की, आज त्यांना भेटणं, बोलणं हे स्टेटस्
सिंबॉल समजलं जातं. हे यश त्यांनी अतिशय कष्टाने, मेहनतीने मिळवलं आहे. टीकांकडे लक्ष देण्यापेक्षा, तुमच्यासाठी मदतीचा हात देणार्याची कदर करा व त्यांचा विश्वास सार्थ करा. कायम काहीच राहत नाही, ना रात्र ना दिवस. तुमची ही वेळ निश्चितच बदलेल… शंभर अपयशांनंतर मिळणारं, यश हे शंभर नंबरी सोन्यासारखंच लखलखीत असणारच! ह्याची खात्री बाळगा. झटकून टाका, निराशा, दुःख व लागा कामाला, आपल्या आई-वडिलांच्याकडे नीट बघा. त्यांच्या चेहर्यावर तुमच्यासाठी असलेले प्रेम जपा, सांभाळा. ठाम राहा आपल्या मतांवर.
Try, try & try until you succeed. नसेल आपली ओळखपण एक आई या नात्याने मुलांचं मन ओळखता येतं, म्हणून समजावण्याचा एक प्रयत्न केला आणि करीतच राहणार!