मुंबई : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma Suicide Case) आत्महत्येन देशभरातून प्रतक्रिया उमटत आहेत. सेटवरच आत्महत्या केल्याने या प्रकरणाची खोलवर चौकशी होताना दिसत आहे. तुनिशाने तिचा बॉयफ्रेंड दास्तान – ए – काबुल मधील सहकलाकार शिजान खान (Shijan Khan) याच्यामुळेच आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला आहे. दरम्यान, तुनिशाने आत्महत्या देखील शिजानच्या मेकअप रूममध्येच केली आहे. शिजानला पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांच्या पोलीस कोठडीत तो सध्या आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात लव्ह जिहादचा देखील अँगल दिला जात आहे. (Love Jihad And Tunisha Sharma Suicide Case)
भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी हे प्रकरण लव्ह जिहाद संबंधीत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून अनेकजण अशाच चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणतात पोलीस :
“तुनिशा आत्महत्या प्रकरणाचा आम्ही खोलवर तपास करत आहोत. अजून तरी या प्रकरणात लव्ह जिहादचा प्रकार समोर आलेला नाही. शिजान आणि तुनिशा दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. परंतू यांचे ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती. याच तणावामध्ये तिने आत्महत्या केलीये. अजून तपास हा सुरू आहे आणि लवकरच तुनिशाच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे येईल. तुनिशा ही प्रेग्नेंट होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केलीये. अशी अफवा पसरत होती. परंतू असे काही नाहीये. तुनिशा हिने तिच्या आईला सांगितले होते की, शीजानसोबत तिचे ब्रेकअप झाले आहे.”अशी माहिती पोलिसांनी दिली.