‘या’ कारणामुळे तुनिषाला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिला अखेरचा निरोप

मुंबई | Tunisha Sharma – 24 डिसेंबरला प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिषानं अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तसंच तुनिषाच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच 27 डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्यात आले होते. पण तिला लाल रंगाचे कपडे का परिधान करण्यात आले होते, याबद्दल विविध तर्क लावले जात होते. मात्र आता यासंदर्भातलं कारण समोर आलं आहे.

तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी ‘आज तक’शी बोलताना तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी लाल रंगाचे कपडे परिधान का केले यामागचं कारण सांगितलं आहे. “लाल रंग तुनिषाला खूप आवडत होता. तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्याची आवड होती. त्यामुळेच आम्ही तिला लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तिला परिधान केलेले कपडे हे तिचे आवडते होते. त्यामुळे आम्ही तुनिषाला तिच्या अंत्यसंस्कारावेळी लाल रंगाचे कपडे घातले होते”, असं पवन शर्मा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. तसंच तुनिषाच्या काकांनी तिला मुखाग्नी दिली. यावेळी तिचे अनेक सहकलाकार आणि सिनेसृष्टीतील मित्रमंडळीही उपस्थित होती.

Sumitra nalawade: