कलाक्षेत्रावर शोककळा ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं निधन

कोल्हापूर : (‘Tuzyat Jiv Rangla’ Fem actress Kalyani Jadhav Death) मागील काही दिवसात महाराष्ट्रात भुरुळ घेतलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे.

कल्याणी जाधव यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

Prakash Harale: