‘घरबसल्या ट्विट करणे हा…’; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई : मुंबई बाँबस्फोटापासून ते जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविणे, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, ‘काश्मीर फाईल्स’चित्रपट या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकांवर १४ ट्विट करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यादरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरणात खोचक प्रतिक्रिया येत आहेत. तसंच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही त्यावर फडणवीसांवर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, अलिकड व्हाट्सअपचं युद्ध आहे. चार चौघांनी जमायचं फोटो काढायचे सोशल मीडियावर पोस्ट करायची आणि नंतर तिथेच एकमेकांना शिव्या द्यायच्या हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एखाद्याला फारच काही सांगायचं असेल तर मग १० ते १५ ट्विट करत बसायचं. घरबसल्या ट्विट करणं, महाराष्ट्राला आणि देशाला उद्देशून भाषण करुन मुद्दे मांडणे हा ट्रेंड झाला असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

Sumitra nalawade: