मुंबई | Twinkle Khanna Reacts On Ranveer Singh Nude Photoshoot – बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रणवीरच्या या फोटोंवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सगळ्यांमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विंकल खन्नाने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ट्विंकल म्हणाली, “मी या फोटोशूटमुळे नाराज झालेल्या लोकांना सांगू इच्छिते की ‘द नेकेड ट्रस्ट’ फेलोशिप सुरू करण्यासाठी कोणाची वकिली करत नाही.”
आपला मुद्दा मांडत ट्विंकल पुढे म्हणाली, ‘या फोटोशूटमुळे भावना दुखावलेल्या महिलांची संख्या जास्त नाहीये. आमची एकच तक्रार आहे. रणवीर सिंगचे फोटो ओव्हर एक्सपोज करण्याऐवजी अंडरएक्सपोज असल्यासारखे वाटतात. भिंग, दुर्बीण आणि चष्मा लावून बघितल्यावरही मला काहीच दिसलं नाही. मी फोटो झूम करूनही पाहिले पण मला काहीच दिसलं नाही आणि असं करत असताना माझा मुलगा आरव तिथे आला. मग मला स्वतःचीच लाज वाटली. कारण मला या फोटोंमध्ये काही आक्षेपार्ह आहे का शोधायचे होते जे सापडलं नाही.