Twitter Stock Trading : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने अलीकडेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे रीब्रँड केले आहे. आता या प्लॅटफॉर्मला एक्स असे नाव देण्यात आले आहे. ट्विटरचा पारंपारिक लोगो देखील बदलला आहे.
मस्कला X हे एव्हरीथिंग अॅप/प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करायचे आहे, म्हणून Twitter चे रीब्रँडिंग केले आहे. आता X प्लॅटफॉर्मवर शेअर ट्रेडिंग देखील सुरु करता येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. याविषयीची माहिती Semafor ने एक दिवस आधी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी दिली होती. X प्लॅटफॉर्मखाली लवकरच ट्रेडिंग हब सुरू होऊ शकेल, असा दावा यात करण्यात आला आहे.
सूत्रांचा हवाला देत Semafor यांनी सांगितले की, इलॉन मस्क यांना X हे आर्थिक डेटा पॉवरहाऊस बनवायचे आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार, एक्सने यासाठी इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी संपर्क साधला. एक्स सर्वसमावेशक आर्थिक कंटेंट, रिअल टाइम स्टॉक फीड आणि अनेक सेवा देण्याची योजना आखत आहे. यासाठी X ने गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक सेवा पुरवठादारांशी संपर्क साधला आहे.