ट्विटरचा युजर्सना मोठा धक्का! 1 एप्रिलपासून केले नवीन नियम लागू, पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं आता…

मुंबई | Twitter Blue Tick Subscription – ट्विटरने (Twitter) युजर्सना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. 1 एप्रिलपासून ट्विटरने नवीन नियम लागू केले आहेत. आता पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टिक (Blue Tick) हटवलं जाणार आहे. याबाबत ट्विटरकडून परिपत्रक जारी करत नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.

आता अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे. ज्या ट्विटर युजर्सचं अकाऊंट ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनचं असेल, त्यांच्याच अकाऊंटच्या ब्लू टिक कायम ठेवण्यात येतील. बाकीच्या अनपेड अकाऊंटच्या ब्लू टिक हटवण्यात येणार आहेत. ट्विटरकडून 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. तसंच भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना शुल्क आहे.

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनच्या (Twitter Blue Tick Subscription) निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्यांनाच ट्विटरची ब्लू टिक मिळणार आहे.

Sumitra nalawade: