पुणे हादरले! एकाच दिवशी दोन तरुणांचा खून

पुण्यात एकाच दिवशी दोन तरुणांचा खून

गणेशोत्सव मिरवणुकीत झालेल्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना वडगाव बुद्रूक परिसरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याच दिवशी अन्य एका घटनेत हडपसरजवळ रामटेकडी परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. श्रीपत अनंत बनकर (वय १७, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रूक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपत बनकर आणि अल्पवयीन मुले वडगाव बुद्रूक येथील निवृत्तीनगर भागात राहतात. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्यांच्यात वाद झाला होता. श्रीपत मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता मित्रासमवेत दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी तिघांनी श्रीपतला अडवून ‘तू आमच्याकडे रागाने का बघतो?’ अशी विचारले. त्यावेळी झालेल्या भांडणात अल्पवयीन मुलांनी श्रीपतवर कोयत्याने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने श्रीपतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिघे आरोपी पसार झाले. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पर्वती टेकडी परिसरातून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हिंगणे खुर्द परिसरात काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती. 

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना रामटेकडी भागात मंगळवारी घडली. यश सुनील घाटे (वय १७, रा. रामटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल लतीफ शेख (वय १८) आणि ताहीर खलिल पठाण (वय १८, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे करीत आहेत.
तर दुसरीकडे मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयाकडून चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केले. पुण्यातील प्रसिद्ध गरवारे महाविद्यालयाजवळ   हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झालाय. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि जखमी करून गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

आरोपीची आणि जखमी तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहे. दरम्यान काल दुपारच्या सुमारास जखमी तरुण आरोपीच्या मैत्रिणीसोबत बोलत होता. यावेळी या तरुणीने माझे विषयी अफवा पसरवतो का असे म्हणत झालेला प्रकार आपल्या आरोपी मित्राला सांगितला. त्यानंतर आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर हातात कुलथे घेऊन या आरोपींनी जखमी तरुणाचा पाठलाग सुरू केला. गरवारे महाविद्यालयापासून ते एरंडवण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी हातात कोयते घेऊन पाठलाग करत होते. 

Rashtra Sanchar: