UAE चे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन, ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दुबई : संयुक्त अरब अमीरातचेअध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. युएईची अधिकृत वृत्तसंस्था WAM ने या घटनेला दुजोरा दिला आहे. अध्यक्षांच्या निधनानंतर सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याचबरोबर देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान हे 3 नोव्हेंबर 2004 पासून युएईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारत आहेत. त्याआधी 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान देशाचे प्रमुख होते. शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. त्यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावून अनेक सुधारणा केल्या आहेत.

Dnyaneshwar: