सीमावादावर अमित शहांनी नाही; तर ‘या’ नेत्याने करावी मध्यस्थी उदयनराजेंची आग्रही मागणी!

सातारा : (Udayanraje Bhosale On Narendra Modi) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पार पडलेल्या कालच्या बैठकीला 24 तास देखील उलटले नाहीत तर, राजकीय मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. यावर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी टिप्पणी केली असून या वादामध्ये गृहमंत्री अमित शहांची नव्हे तर पंतप्रधानांची मध्यस्थी गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपच्या नेते मंडळींनाच अमित शहांची मध्यस्थी मान्य नसल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, भाषावर प्रांतरचना होणं अपेक्षित होतं पण तशी झाली नाही. यासाठी महाजन समिती नेमली गेली, पण या समितीलाही हे जमलं नाही. तुमच्या राजकारणामुळं सीमाभागातील लोकांची प्रगती खुंटली आहे. अशा विषयांमध्ये चर्चा किंवा मध्यस्थी पंतप्रधानांनी करणं गरजेचं आहे. त्यातूनच काही तर मार्ग निघण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले आहेत.

संबंधित राज्यातील प्रमुख राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी उदयनराजे यांनी मांडली. सीमाभागात राहणारे लोक महाराष्ट्रातील असोत किंवा कर्नाटकातील त्यांची यामध्ये काय चूक आहे. याबाबत तुम्ही माणुसकीचा विचार करणार आहात की नाही? असा सवालही यावेळी उदयनराजे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमधून सीमावादाच्या नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

Prakash Harale: