सातारा : (Udayanraje Bhosale On Shinvendraraje Bhosale) आगामी पालिकेच्या तोंडावर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक खडाजंगी पहायला मिळत आहेत. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. यामुळे साताऱ्यात दोन राजांमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, साताऱ्यात शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. या निवडणुकीचा निकाल आत्ताच लागला आहे, असा दावा देखील उदयनराजे यांनी केला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काय रंगणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप सिद्ध झाले, तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन, असे उदयनराजे म्हणाले आहेत. या आरोपांबाबत पुरावे देऊ न शकल्यास शिवेंद्रराजेंनी या किल्ल्यावरुन उडी मारावी, असे आव्हान उदयनराजे यांनी दिले आहे.