नवी दिल्ली : (Udddhav Thackeray On Eknath Shinde) मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होत असून विधानसभा अध्यक्षांना याप्रकरणी योग्य ते निर्देश देण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा सुनावण्या झालेल्या आहेत तेव्हा राहुल नार्वेकरांकडून काहीतरी कार्यवाही झालेली आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह अन् पक्षाचे नाव या दोन प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिल्याने आयोगाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याने सुप्रीम कोर्ट त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार का? हे पाहावं लागेल.