उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, जाणून घ्या नेमकं कारण काय?

pune 34pune 34

मुंबई | Uddhav Thackeray And Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र यावेत अशी इच्छा शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून व्यक्त केली जात होती. तर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आज मुंबईतील दादर येथे राज ठाकरेंच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते. या कार्यक्रमातील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुडा समारंभात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी चर्चा केली आणि एकमेकांची विचारपूस केली. तसंच यावेळी शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची देखील भेट झाली.

Sumitra nalawade:
whatsapp
line