बंडखोरीनंतर कोरोनाचा धक्का, राज्यपालानंतर मुख्यमंत्र्यांनाही संसर्ग!

मुंबई – Uddhav Thackeray corona Positive | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार बरखास्तीच्या मार्गावर आहे. सकाळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांची अँटिजेंट चाचणी ही पॉझिटिव्ह आणि RTPCRची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता मोठा संभ्रम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदार निसटले असल्याची माहिती समजत आहे. यामध्ये उस्मानाबादचे कैलास पाटील आणि अकोल्याचे नितीन देशमुख हे माघारी मुख्यमंत्र्यांच्या गोटात आल्याचं समजत आहे.

RashtraSanchar: