मुंबई : (Uddhav Thackeray in Meeting) केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे यांनी काल तातडीची बैठक बोलवली होती. त्यानंतर आज देखील उद्धव तातडीची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेय
दरम्यान, पार पडणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील भूमिका आणि कोर्टात कशा प्रकारे बाजू माडांची याची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. ही बैठक साडे तिन वाजता उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बोलवण्यात आली आहे.