मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार मोठी घोषणा? पाच वाजता जनतेशी साधणार संवाद

मुंबई | Uddhav Thackeray Live On Facebook – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पाच वाजता फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

तसंच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली असल्याची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातलं एक ट्वीट देखील केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Sumitra nalawade: