अजितदादांचा चौकार, उद्धव ठाकरेंनी संधी मिळताच ठोकला षटकार! अन् झाला टाळ्यांचा कडकडाट!

मुंबई : (Uddhav Thackeray On Ajit Pawar) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज वयाची पंच्याहत्तरी पार पडली. त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुमासदार भाषण केलं. यावेळी अजितदादांच्या भुजबळांवरील फटकेबाजीलाही ठाकरेंनी उत्तर दिलं, ज्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला तर पुढील काही वेळ शिट्ट्याच थांबल्या नाहीत. या सर्व कार्यक्रमात ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैली भाषणाचे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. भुजबळांचं मोठेपण सांगतानाच त्यांची मुख्यमंत्रिपदाची त्यांची संधी कशी हुकली, याचाही किस्सा सांगितला. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळी पहिल्या निवडणुकीत आपल्याला ५८ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या. पण आणखी चार-पाच महिने जर प्रचाराला मिळाले असते तर, भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असं अजितदादा म्हणाले.

त्यानंतर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिल्यावर सभागृहातल्या टाळ्या काही वेळ थांबल्या नाहीत. उद्धवसाहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशा घोषणा सभागृहातील लोकांनी दिल्या. सभागृहातील लोकांचा पाठिंबा पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले. काही संकेदाचा पॉझ घेऊन ठाकरेंनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी भुजबळांच्या ‘त्या’ हुकलेल्या मुख्यमंत्रिपदावर खुमासदार कमेंट केली. अजितदादा म्हणाले, त्यावेळी पाच महिने प्रचाराला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, पण मला म्हणायचंय, भुजबळांनी जर शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते! त्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Prakash Harale: