शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ, मातोश्रीवर युतीची घोषणा! उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला अनेक मोठे हादरे बसले. यामुळे ढासाललेल्या सेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शिंदे-भाजपला शह देण्यासाठी आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येत युती केली केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी शिवसेनेसोबत आल्यानं स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर, देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणित विषमतावादी विचारांना सर्वशक्तीनिशी कार्यपद्धतीनं विरोध केला. मुख्यमंत्री म्हणून ते नेहमी जनतेच्या बाजूने कायम राहिले. संभाजी ब्रिगेड देखील लोकहित आणि महाराष्ट्राच्या लोकहितावर काम करत आहे. यामुळे आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं एकत्र यायचं ठरवलं आहे.  देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचं ते म्हणाले.

Prakash Harale: