…तर खपवून घेतलं जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा!

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) गुरुवार दि. १४ रोजी रात्री भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर हल्ला झाला. यावेळी पोलिसांनी त्यांची दखल न घेता साधी तक्रारही घेतली नाही. त्यानंतर शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावर असलेल्या 208 नंबरच्या शाखेला भेट दिली, यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान ठाकरे पोलिसांना म्हणाले, तुम्ही राजकारणात पडू नका, राजकारणाचं काय करायचं ते आम्ही बघू, लढायचं ते लढू. पण जीवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही. शिवसैनिकाच्या केसाला जरी हात लागला तरी तुम्ही जबाबदार असाल. असं ठणकावत पोलिसांना चांगलचं धारेवर धरलं. तसचं शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होतअसलं तर, खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला आहे.

संरक्षण देणं तुमच्याकडून होणार नसेल तर हात वर करा, मग शिवसैनिक बघतील कसं रक्षण करायचं ते, शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहेत, असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हाणाले. आपल्याकडे कर्तेकरविते उपमुख्यमंत्री आहेत, त्या उपमुख्यमंत्र्याना जाऊन विचारा, तुम्ही सांगा की आमच्याकडून तुमचं संरक्षण शक्य नाहीये, मग आमचं संरक्षण आम्ही करतो, असा खोचक टोला देखील ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

Prakash Harale: