देवेंद्रजी परिवारावर बोलू नका, नाहीतर तुमच्या परिवाराचे…”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

मुंबई | Uddhav Thackeray – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्रजी परिवारावर बोलू नका, तुमचाही परिवार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईवरून टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या कोविड काळातील भ्रष्टाचार ते काढत आहेत. पण त्यावेळेस जे सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नेहमी पहिला क्रमांक आला ही त्यांची पोटदुखी आहे. त्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचं नाव नव्हतं. त्यांना या पोटदुखीसाठी निवडणुकीत जमालगोटा द्यावा लागेल. त्यांना घोड्यांचंच औषध द्यावं लागेल. एकदाच त्यांचा कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल.”

“सध्या कोरोना काळातील घोट्याळ्याच्या नावे बोभाटा सुरू आहे. एक साधा शिवसैनिक असलेल्या सूरजच्या घरावर धाड टाकली. यावरून ठाकरे कुटुंबाला धक्का असं म्हटलं जातंय. त्यांच्या मनात भीती बसली आहे. मी पाटण्याला गेल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेले. देवेंद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर तुम्ही बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हाॅटसअप चॅट बाहेर येत असून त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. कारण इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे तुम्ही माझ्या परिवारावर बोलू नका”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.

Sumitra nalawade: