मुंबई : (Uddhav Thackeray On Eknaht Shinde) शिवसेनेच्या बंडखोरी केलेल्या 40 आमदारांपैकी 25 आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात करण्यात आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा बंडखोरीचा भूकंप होणार का? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे.
दरम् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.