मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक आयोगाने त्यासंबंधीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. भाजप आणि शिवसेनेत येथे सामना होतो आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितल्याने पक्षचिन्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आणि त्यात आता निवडणुकीची घोषणा झाल्याने धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? याची महत्त्वाची माहिती कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी दिली आहे. जर शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही, तर शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळेल, अशी महत्वपूर्ण कमेंट उज्वल निकम यांनी केली आहे.
शिंदे गटाने भाजपपुरस्कृत उमेदवार उभा केला आणि ठाकरे यांनीही उमेदवार उभा केला तर निवडणूक चिन्ह कोणाला मिळेल? निवडणूक चिन्हाचा वाद या पोटनिवडणुकीच्या अगोदर संपलेला नाही, तर दोन्ही बाजूंकडून पुरावा द्यायला वेळ लावला जात असेल तर निवडणूक आयोगापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे निवडणूक चिन्ह गोठवणे. दोन्ही बाजू दावा करत असतील आयोगाला ते चिन्ह गोठवावे लागेल, असंही उज्वल निकम यांनी सांगितले