धनुष्यबाणासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची दिल्लीला धडक; निवडणूक आयोगासमोर आज निर्णय!

नवी दिल्ली : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) दोन दिवसांपुर्वी मुंबईत दसरा मेळावा पार पाडला. त्यानंतर दिल्लीत धनुष्याबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षासाठी हालचालींना वेग आला आहे. त्या पाश्वभुमीवर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज दिल्लीला धडकले आहे. त्यांच्याकडून आज आयोगासमोर शिवसेनेची बाजू मांडली जाणार आहे. त्या काही पुरावे देखील सादर करण्यात येणार आहेत.

आज दुपारी 1 वाजता आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते आणि वकिलांची टिम दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह राहणार का गोठवलं जाणार हे पहाणं आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागला आहे.

Prakash Harale: