मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 12 खासदार यांना सोबत घेऊन शिवसेना पक्षात उभी फूट पाडली. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद निर्माण झाला आहे. यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “शिंदे धनुष्यबाण चिन्हावर दावा करू शकत नाही कारण त्यांनी आणि समर्थक आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना पक्ष सोडला आहे. जर तुम्ही स्वःता पक्ष सोडून केला असाल आणि पक्षाचे सदस्य देखील नसाल तर, तुम्ही असा दावा कसा करू शकतात असा सवाल केला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात शिवसेना आणि शिंदे गटामध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी निर्माण झालेला वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. त्या पार्श्वभुमीवर आज दिल्लीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी केलेल्या दाव्यावर शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.
निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. जर शिवसेनेच्या वतीने कोणतंही उत्तर आलं नाही, तर याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केलं आहे.