नांदेड : (Uddhav Thackeray On Eknath shinde) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिंदे या दोन्ही पक्षाला मिळालेले नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे.
त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला हे निवडणूक चिन्ह नाकारलं. त्याप्रमाणे याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसं, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.
शिवसेना-शिंदे गटाच्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे आणि धनुष्यबाण चिन्ह हंगामी गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आलं. मात्र. आता हे दोन्ही चिन्ह न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.