जिंकण्यासाठीच मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिंकण्यासाठीच मैदानात उतरा असे शिवसैनिकांना आदेश देत आगामी काळातील निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या महापालिका आणि सिनेटच्या निवडणुका लक्षात घेता ठाकरेंनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वरील आदेश दिले आहेत. त्यांचा हाच आदेश घेऊन शिवसैनिक आता जोमाने कामाला लागणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांकडे बघता एकमेकांशी समन्वय साधून काम करा असाही ठाकरेंनी कानमंत्र दिला आहे. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे, अशा विश्वासार्ह वक्तव्य करत, ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरत त्यात फुंकार घातली आहे.

शिवसैनिकांत जोश भरत पुढे ते म्हणाले, सत्ता येतात जातात परंतु आपल्याला संघटना वाढीसाठी काम करावे लागणार आहे. सध्याच्या सरकारची त्यांच्या सोयीनुसार प्रभागाची रचना करून घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळेच या सरकारने पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. एकूणच काय तर, सध्याच्या सरकारचा मनमानी कारभार सुरु असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या मोजक्याच मात्र, मनाला भिडणाऱ्या संवादाने शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ झटकत पुन्हा एकदा नवं चैतन्य आणि उत्साह बाहेर घेऊन पडण्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं.

Prakash Harale: