ठरलं! शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ठाकरे, शिंदे, फडणवीस एकाच मंचावर

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सर्व काही दिलं. त्या पक्षाशी बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार का? झालं गेलं विसरुन जातील का? का बंडखोरीची सल त्यांच्या मनात कायम राहणार हे काळच ठरवणार आहे. मात्र, त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारलंतर बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे-फडणवीस एका मंचावर दिसणार आहेत

या कार्यक्रमाला दिग्गज अभिनेता आणि बाॅलिवूडच्या ‘बीग बी’ ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन, प्रार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

Prakash Harale: