मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून आगामी दसरा मेळाव्यासाठी (Shivsena Dasara Melava) एक महिना अगोदरच मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सावध भूमिका घेत एक महिन्यापूर्वीच शिवाजी पार्क मैदानासाठी दावेदारी निश्चित केली आहे. मागीलवर्षी दसरा मेळाव्याला मैदान देण्यासाठी महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. त्यानंतर न्यायालयाने बीएमसीला कारभारावर ताशेरे ओढत ठाकरेंना सभा घेण्यासाठी मैदान देण्यात आलं.
गेल्यावर्षी शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी (Shivsena Dasara Melava) शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सावध पावले उचलण्यात आली आहेत. ठाकरे गटाने अर्ज करताना या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे ठाकरे गटाचं वैभव राहिलं आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येत असतात. मात्र गेल्यावर्षी शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीने दोन गट झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी दोन मेळावे झाले होते. एकनाथ शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात मेळावा घेण्यात आला होता.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून (Eknath Shinde) आमदार सदा सरवणकर यांच्याकडून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेते विभागप्रमुख महेश सावंत यांच्याकडून पत्र देण्यात आलं आहे. ठाकरे गट तसेच शिंदे गट दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आग्रही आहेत. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे यासाठी एक महिना आधीच मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पत्र दिल्याची माहित दोन्ही गटाच्या नेत्यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क दोन्ही गटांना मिळावं यासाठी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला द्यायचं? यावर निर्णय घेणार असल्याची माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यास पुढील भूमिका दोन्ही गटाकडून घेतली जाणार आहे.