बंडानंतर ठाकरेंचा सावध पवित्रा; पदाधिकाऱ्यांच्या फेरबदलांच सत्र सुरु!

मुंबई : (Uddhav Thackeray On Meeting Shivsena Bhavan) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवलं. आमदारांनंतर शिवसेनेतील खासदार, पदाधिकारी फुटणार अशा चर्चा रंगवल्या जात आहेत.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. शिंदे यांना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन नेत्यांच्या नियुक्त्यासंदर्भात ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक सत्र सुरु झाले. रविवार दि. १० रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

बाहेरील सर्व आंदाज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग आणि शाखाप्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीत विभागवार शिवसेना मजबूत करा असे आदेश देण्यात आले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील विभागप्रमुख्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असून काही पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेत खांदेपालट होणार असा आंदाज व्यक्त केला जात आहे.

Prakash Harale: