उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसैनिक-भाजप कार्यकर्ये आमने-सामने?

रत्नागिरी : (Uddhav Thackeray On Narayan Rane) बारसू रिफायनरीवरुन Barsu Refinery) सध्या कोकणातील राजकारण चांगलंय तापलंय. या पार्श्वभूमिवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथिल रिफायनरीला विरोध दर्शवण्यासाठी उद्या शनिवार 6 मे रोजी स्थानिकांची मतं जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर रानतळे येथे जाहीर सभा होणार होती. परंतू उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या सभेला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनानं दिली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.

राजापुरातील विविध संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारे समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिंद गट रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे. उद्धव ठाकरे उतरत असलेल्या हेलिपॅडपासून भाजप-शिंदे गटाचा मोर्चा निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राजकारण तापणार हे मात्र नक्की.

उद्धव ठाकरेंना यापुर्वीच बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ते म्हणाले, प्रकल्प चांगला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर स्थानिकांसमोर प्रेझेंटेशन द्या, अशी मागणी त्यांना केली आहे. तर याच दिवशी भाजपचे काही नेते बारसू प्रकल्याच्या समर्थनार्थ रत्नागिरी दौरा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नसल्यानं आता सभा होणार का नाही हे देखील पाहावं लागणार आहे.

Prakash Harale: