शिवरायांच्या अपमानावर थंड? पण, “मोदींना रावण म्हटलं की,…” शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई : (Uddhav Thackeray On Narendra Modi) सध्या होवू घातलेल्या गुजरात निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 100 तोंडी रावण संबोधण्यात आलं. त्यानंतर मोदी म्हणाले, हा गुजरातच्या आणि येथिल भुमिपुत्रांचा अपमान आहे. याच विषयाला अनुसरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपवर हल्ला चढवण्यात आला आहे.

दरम्यान सामनात म्हटलं आहे की, मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान होत असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना भापज पाठीशी का घालत असून त्यांचा एकप्रकारे बचाव करण्याचे काम चालू आहे. मग त्याला काय म्हणायचं. भाजपचे शिवरायांवरील रोज उघडे पडत आहे. असा निशाणा साधण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून शिवरायांवर वादग्रस्त वाक्तव्य करण्यात आली मात्र, यावर एकही शब्द बोलायला भाजप तयार नाही, असा सवाल करण्यात आला आहे.

.

Prakash Harale: