चिंचवड : (Uddhav Thackeray On Rahul kalate) चिंचवडमध्ये राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अद्यापही चिंतेत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतील उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल कलाटे नाराज झाले झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक विनवण्या करुनही राहुल कलाटे हे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता मविआने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माध्यमातून राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी मनधरणी सुरु केल्याचे दिसत आहे.
दरम्या, अजित पवारांच्या खास मर्जीतील व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांना खास संदेश पाठवल्याचे समजते. आज उद्धव ठाकरे स्वत:ही राहुल कलाटे यांच्याशी फोनवरुन बोलू शकतात. राहुल कलाटे यांनी मविआला मदत करावी, हाच आमचा प्रयत्न राहील, असे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का?, हे पाहावे लागेल.
भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या (Ajit Pawar) खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपला सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान आहे. अशात राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.