दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले; “मुख्यमंत्रीपद नसल्याने…!”

मुंबई : (Uddhav Thackeray On Relel Shinde Group) मागील काही दिवसांपासून दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून सत्तासंघर्ष सुरु आहे. यावर आज खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच प्रतिक्रिया देत ते म्हणाले, “यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, “मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो” असं ते म्हणाले.

“माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Prakash Harale: