ठाकरे-राऊतांना दिलासा! राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी, माझगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

Thackeray RautThackeray Raut

मुंबई : (Uddhav Thackeray Sanjay Raut court bail approved) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांना राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कोर्टात उपस्थित होते. १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टाने केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले.

सामना मुखपत्रामध्ये माझ्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापून आलाय, असं म्हणत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी मानहाणीचा दावा ठोकत कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी उद्धव ठाकरे अन् संजय राऊत यांनी माफी मागवी, अशी त्यानी मागणी केली होती. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून प्रकरण कोर्टात आहे. माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे तुर्तास ठाकरे-राऊत यांना दिलासा मिळाला असून पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Prakash Harale:
whatsapp
line