उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला जाहीर आव्हान; म्हणाले “हिंमत असेल तर…”

मुंबई : सोमवार दि. ०४ रोजी विधानसभेच्या विशेष आधिवेशनात शिंदे गटाने भाजपच्या मदतीनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी संवादात उद्धव ठाकरेंनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, शिवसैनिकांनो लढायचे असेल तर सोबत राहा एकजुटीनं लढू. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हानही त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा.

Prakash Harale: