23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार, प्रकरणाला नवं वळणं

मुंबई : (Uddhav Thackeray’s tenure as party chief will 23 Jan end) सहा महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेना पक्षात बंडखोरी केली. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना हा वाद न्यायालयीन वाद सुरु झाला. एकीकडे शिवसेना पक्षासाठी आणि चिन्हासाठी लढाई सुरु असताना शिवसेनेसमोर आणखी एक पेच उभा राहिलाय..

निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे… 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. अवघे बारा दिवस उरले असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.   तर दुसरीकडे  निवडणूक आयोगासमोर काल झालेल्या सुनावणीत शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा केला.

यावरुन जोरदार घमासान झालं. आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण २०१८ साली झालेली शिवसेनेतील संघटनात्मक निवडीची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच झाली आहे असा दावा आता ठाकरे गट करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं त्यावेळी शिक्कामोर्तब केलेली कॉपी पुरावा म्हणून देणार आहे. आता या प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे.  

Prakash Harale: